मुंबईतील इमारतीत आग, घर जळून खाक; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी

राजधानी मुंबईत घडणाऱ्या आगीच्या घटना चिंताजनक असून येथील उंच उंच इमारतीमध्ये आगीची घटना घडल्यास संपूर्ण सोसायटीचा जीव टांगणीला लागतो

Continues below advertisement

Mumbai fire dahisar

Continues below advertisement
1/7
राजधानी मुंबईत घडणाऱ्या आगीच्या घटना चिंताजनक असून येथील उंच उंच इमारतीमध्ये आगीची घटना घडल्यास संपूर्ण सोसायटीचा जीव टांगणीला लागतो
2/7
मुंबईच्या दहिसर पूर्वेतील आनंदनगर परिसरामध्ये आज एका इमारतीमध्ये मोठी आग लागली असून महापालिका प्रशासनाने तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवल्या आहेत.
3/7
आनंद नगर परिसरात सब्जी मार्केट समोर असलेल्या इमारतीच्या पहिला मजल्यावर ही मोठी आग लागली आहे.
4/7
घटनेची माहिती मिळतच अग्निशमन दलाचा चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून 15 ते 20 मिनिटांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत
5/7
सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र इमारतीमधलं घर जळून खाक झाला आहे.
Continues below advertisement
6/7
आग कशामुळे लागली, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी अधिक तपास दहिसर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.
7/7
दरम्यान, दहिसरमधील या आगीच्या घटनेनंतर परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती, त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली
Sponsored Links by Taboola