Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Coastal Road Project : मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील बोगद्याचा दोन किलोमीटर टप्पा पूर्ण
मुंबई कोस्टल रोड बांधकामात पॅकेज 4 अंतर्गत प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान 2.070 किलोमीटर अंतराचा बोगदा दोन्ही बाजूने बांधण्यात येत आहे. (Photo:@mybmcCoastalRd/Twitter)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयातील पहिल्या बोगद्याचा दोन किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे. तर उर्वरित 70 मीटर लांबीच्या बोगद्याचे काम येत्या 8 ते 10 दिवसात पूर्ण होणार आहे.(Photo:@mybmcCoastalRd/Twitter)
संपूर्ण मुंबई किनारी रस्ता प्रकल्पापैकी सुमारे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर 2023 मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. (Photo:@mybmcCoastalRd/Twitter)
दोन्ही बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी 2.070 किलोमीटर एवढी आहे. दोन्ही बोगद्यांचा व्यास हा 12.19 मीटर आहे (Photo:@mybmcCoastalRd/Twitter)
बोगद्यांमध्ये ‘सकार्डो’ ही वायूविजन प्रणाली लावली जाणार असून ती भारतामध्ये रस्ते बोगद्यांसाठी प्रथमच वापरली जाणार आहे.(Photo:@mybmcCoastalRd/Twitter)
बोगद्यांचे खोदकाम बोगदा खणणारे संयंत्र (टीबीएम - टनेल बोअरींग मशिन) च्या सहाय्याने केले जात असून ते भारतातील सर्वात मोठ्या व्यासाचे टीबीएम संयंत्र आहे (Photo:@mybmcCoastalRd/Twitter)
मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेला एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. (Photo:@mybmcCoastalRd/Twitter)
या प्रकल्पामुळे रस्ते प्रवासाचा वेळ कमी होऊन विद्यमान रस्त्यांवरील वाहतुकीची समस्या निवारणासाठी मदत होणार आहे(Photo:@mybmcCoastalRd/Twitter)