मुंबईच्या बाणगंगा तलावात भयानक दृश्य, मासे पटापट मेले, BMCच्या घंटागाडीत जमा झाला ढीग
बाणगंगा माशांची कथा पितृपक्ष विधीनंतर, विशेषतः सर्व पितृ अमावस्येला, मुंबईच्या बाणगंगा तलावात मृत माशांच्या वारंवार आढळणाऱ्या समस्येचा संदर्भ
Continues below advertisement
मुंबईतील बाणगंगा तलावात मृत माशांचा खच
Continues below advertisement
1/10
सर्वपित्री अमावास्येच्या दुसऱ्या दिवसापासूनच वाळकेश्वर परिसरातील बाणगंगा तलावात मृत मासे तरंगताना दिसत आहेत.
2/10
पितृपक्ष, तसेच अमावास्येला धार्मिक विधीनंतर पिंडदानाच्या पिठाचे गोळे, पूजाविधीनंतरचे साहित्य तलावात विसर्जित केल्याने पाणी दूषित झाले आहे.
3/10
हे दूषित पाणी माशांच्या जीवाला घातक ठरले आहे.
4/10
गेल्या दोन दिवसांपासून बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी सतत तलावातून हे मृत मासे बाहेर काढण्याचे काम करत आहेत, जेणेकरून तलावातील पाण्याचा आणखी अपाय होऊ नये आणि परिसरात दुर्गंधी पसरू नये.
5/10
रविवारी सर्वपित्री अमावास्येच्या निमित्ताने बाणगंगेत धार्मिक विधीसाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झाली होती.
Continues below advertisement
6/10
या वेळी निर्माल्य, पिंड आणि इतर पूजासाहित्य थेट तलावात टाकल्याने पाणी प्रदूषित झाले.
7/10
तलावातील पाण्यात कोणताही घातक पदार्थ टाकू नये, असा पालिकेचा आदेश होता.
8/10
ही एक वारंवार येणारी, "वार्षिक शोकांतिका" बनली आहे जी स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणवादी वर्षानुवर्षे नोंदवत आहेत.
9/10
धार्मिक विधींमुळे जलसाठ्यांवर होणाऱ्या पर्यावरणीय परिणामांबाबत योग्य नियमन आणि जनजागृतीचा अभाव आहे, त्यामुळे अशा नैसर्गिक किंवा वारसा असलेल्या जलस्रोतांसाठी शाश्वत पद्धतींची अंमलबजावणी आवश्यक आहे.
10/10
पवित्र मानले जाणारे आणि शतकानुशतके जुन्या परंपरेने समृद्ध असलेले बाणगंगा तलाव, अंतिम अमावस्येच्या उत्सवाचे केंद्रबिंदू बनले, ज्यामध्ये शहरभरातील लोक त्यांच्या पूर्वजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी समारंभात सहभागी झाले (टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 24 Sep 2025 02:18 PM (IST)