Raj Thackeray: त्यांनी मतदान करू नये का? राज ठाकरेंचे निवडणूक आयोगाला 7 खणखणीत प्रश्न

Raj Thackeray: महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांनी आज महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. यावेळी, राज ठाकरेंनी निवडणुकीसंदर्भाने विविध मुद्दे उपस्थित केले.

Continues below advertisement

Raj Thackeray questioned election commission

Continues below advertisement
1/9
महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांनी आज महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. यावेळी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आगामी निवडणुकीसंदर्भाने विविध मुद्दे उपस्थित केले. यावेळी, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांपुढे आयोगही निरुत्तर झाल्याचं पाहायला मिळालं.
2/9
निवडणूक लागलेली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली, असा प्रश्न राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला. त्यामुळे, नुकतेच 18 वर्षे पूर्ण केलेल्या युवकांना मतदान करता येत नाही, असेही राज यांनी म्हटले.
3/9
जे आज 18 वय पूर्ण करत आहेत, त्यांनी मतदान करू नये का, असाही प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला.
4/9
अनेक जिल्ह्यात दोन दोन ठिकाणी मतदारांची नावे आहेत, त्याचं काय करायचं असा सवालही राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला विचारला.
5/9
मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे, या घोळाचं काय करायचं, असाही प्रश्न राज ठाकरेंनी आयोगापुढे उपस्थित केला आहे.
Continues below advertisement
6/9
मतदारयादीतील एका मतदाराच्या मतदार ओळखपत्रावर पाहिले असता वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी असल्याची बाब राज ठाकरेंनी निदर्शनास आणून देत प्रश्न केला.
7/9
निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ, तुम्ही कसं निवडणुकांना सामोरे जाता? असा थेट सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे. त्यामुळे, राज ठाकरेंनी जनतेच्या आणि उमेदवारांच्या मनातील प्रश्न बेधडकपणे आयोगाला विचारले आहेत.
8/9
31 जानेवारी पर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहे. आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का? असा सवाल राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही व्हिव्हिपॅट मशीन लावा, अशी सूचनाही त्यांनी केली
9/9
दरम्यान, निवडणूक आयोगाकडील बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई, अनिल परब, जयंत पाटील (शेकाप) शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, रईस शेख, संदीप देशपांडे, आदित्य ठाकरे, कॉ. प्रकाश रेड्डी उपस्थित
Sponsored Links by Taboola