Amit Thackeray: समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत अमित ठाकरे सहभागी; पाहा फोटो
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आज 'आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी' या घोषवाक्यासह स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी 'आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी' या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
यावेळी मनसेचे पदाधिकारी, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होते.
अनेक पर्यावरणप्रेमींसह अमित ठाकरे यांनी दादर समुद्र किनाऱ्यावर वाळूत रुतलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसंच निर्माल्य उचलून हा किनारा स्वच्छ केला.
अमित ठाकरे यांनी याआधी देखील पर्यावरणीय मुद्यावर भूमिका घेतली आहे.
गणेश विसर्जनानंतर समुद्राच्या भरती ओहोटीमुळे किनाऱ्यावर आलेले गणेश मूर्तींचे अवशेष,निर्माल्य किनाऱ्यावर येते.
या स्वच्छता मोहिमेत मनसे नेते नितीन सरदेसाई सहभागी झाले होते. त्याशिवाय, संदीप देशपांडे, जय शृंगारपुरे, यशवंत किल्लेदार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
मुंबईत गिरगाव, दादर, माहिम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा येथे, रायगड जिल्ह्यात उरण, वर्सोली, नागाव, अलिबाग, मुरुड येथे; तर रत्नागिरीत मांडवी येथे सकाळी 8 ते 10 दरम्यान ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
मुंबईतील वर्सोवा किनाऱ्यावरदेखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली.