मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत

मुंबईतील जनसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून मुंबई लोकलकडे पाहिले जाते, लक्षावधी प्रवासी दररोज मुंबई लोकलमधून प्रवास करतात. त्यामुळे, लोकलच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न असतो.

Continues below advertisement

Mumbai local fire kurla

Continues below advertisement
1/7
मुंबईतील जनसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून मुंबई लोकलकडे पाहिले जाते, लक्षावधी प्रवासी दररोज मुंबई लोकलमधून प्रवास करतात. त्यामुळे, लोकलच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न असतो.
2/7
लोकल सेवा सुरळीत आणि वेळेवर चालवण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील असते, विशेष म्हणजे अपघात रोखण्यासाठीही प्रशासनाने प्रयत्न असतात.
3/7
लोकल ट्रेनमधून पडल्याने अनेक अपघात होतात, त्यामुळे रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासन, प्रवासी अपघात टाळण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र, तरीही काही घटना घडतात.
4/7
कुर्ला आणि विद्याविहार स्टेशन दरम्यान आज ट्रॅकवर उभा असलेल्या लोकलला आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे मध्य रेल्वेची सीएसएमटीकडे जाणारी रेल्वे वाहतूक काही काळासाठी बंद करावी लागली होती.
5/7
मध्य रेल्वेच्या स्लो मार्गावरील वाहतूक ठप्प होती, कुर्ला स्टेशनच्या पुढे काही वेळेसाठी बंद करण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाने तात्काळ लोकल ट्रेनला लागलेली आग आटोकण्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
Continues below advertisement
6/7
आता तब्बल अर्ध्या तासाने आग विझवण्यात आली आहे, त्यामुळे या मार्गावरील लोकल वाहतूक पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरू होते.
7/7
दरम्यान, या लोकलमध्ये केवळ कचरा असल्याने सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही, मात्र आग भडकल्याने ट्रेनचा एक डब्बा जळून खाक झाला आहे.
Sponsored Links by Taboola