मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमध्ये भीषण आग; 10 ते 12 दुचाकी जळाल्या, फायर ब्रिगेड मदतीला

Dadar railway station fire parking

1/7
मुंबईतील सर्वात मोठं जंक्शन असलेल्या दादरमध्ये रेल्वे स्टेशनमधील फलाट क्रमांक 14 जवळील दुचाकीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
2/7
फलाट क्रमांक 14 बाहेरील पार्किंग स्टँडमध्ये उभ्या असलेल्या एका दुचाकीला आग लागली. त्यानंतर ही आग भडकत गेल्याने आगीत 10 ते 12 दुचाकी जळाल्यांची सूत्रांची माहिती आहे.
3/7
iपार्किंगमधील गाडयांना आग नेमकी कशी लागली हे अद्याप अस्पष्ट आहे, मात्र आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमक दल दाखल झाले होते.
4/7
अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याचं पाहायला मिळालं, वेळीच नियंत्रण मिळाल्याने मोठा अनर्थ टळला.
5/7
आगीच्या दुर्घटनेत सुदैवाने कुठलीही जिवतहानी झाली नसून 10 ते 12 गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे, या घटनेचा तपास सुरू आहे.
6/7
आगीचं नेमकं कारण काय? याचा शोध माटुंगा पोलिस घेत आहेत. आग लागली की आग लावण्यात आली अशीही चर्चा परिसरात होत आहे.
7/7
दरम्यान, दादर रेल्वे स्टेशन हा अत्यंत रहदारीचा आणि गर्दीचा परिसर आहे, त्यामुळे येथून नेहमीच वर्दळ असते. आग लागल्याचे समजताच अनेकांनी घटनस्थळी धाव घेतली होती.
Sponsored Links by Taboola