Mamta Banerjee: ममता बॅनर्जींची अमिताभ बच्चन यांच्या घरी भेट, राखी बांधत दिल्या शुभेच्छा
INDIA आघाडीच्या बैठकीला मुंबईत आलेल्या पश्चिम बंगालतच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appममता बॅनर्जी आणि अमिताभ बच्चन यांच्याशिवाय जया बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि बिग बींची लाडकी नात आराध्या बच्चन देखील या फोटोंमध्ये दिसत आहेत.
बुधवारी देशभरात राखीचा सण साजरा केला जात आहे. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही अमिताभ बच्चन यांच्या घरी पोहोचल्या.
त्याची काही छायाचित्रे ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आली आहेत. ज्यामध्ये ममता बॅनर्जी अमिताभ आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत कॅमेऱ्यासाठी पोज देत आहेत.
ऐश्वर्या आणि जया बच्चन यावेळी पारंपरिक लूकमध्ये दिसल्या. दोघींनीही क्रीम आणि व्हाईट शेडचा सूट कॅरी केला आहे.
ममता बॅनर्जी या आज विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईमध्ये आल्या आहेत.
अमिताभ बच्चन यांच्या भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी या उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेल्या.
मुंबईत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची बैठक होणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. इंडिया आघाडीची ही तिसरी बैठक असेल.