Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माघार नाहीच! अखेर सदा सरवणकरांनी उमेदवारी अर्ज भरलाच; माहीममध्ये रंगणार तिहेरी लढत, अमित ठाकरेंची वाट खडतर?
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या मतदारसंघावर खिळलं होतं. तसेच, पुतण्या उभा राहिल्यामुळे काका उद्धव ठाकरे आपला उमेदवार उतरवणार की नाही? अशा चर्चा रंगल्या होत्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण, उद्धव ठाकरेंनी सर्व चर्चांना पूर्णविराम देत महेश सावंत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. तर, महायुतीकडून शिंदेंनी विद्यमान आमदार सदा सरवणकरांना तिकीट दिलं. त्यामुळे या मतदारसंघात तिहेरी लढत होणार, असं बोललं जातं होतं.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार होते, तर शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांच्यात लढत होणार होती. पण सदा सरवणकरांचं काय? अर्ज मागे घेणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या.
दरम्यानच्या काळात महायुतीच्या नेत्यांनी अमित ठाकरेंना पाठिंबा देत असल्याची वक्तव्य केल्यामुळे सदा सरवणकर उमेदवारी अर्ज मागे घेणार, असं बोललं जात होतं. त्यापद्धतीनं मुख्यमंत्र्यांकडून सरवणकरांची तशी मनधरणी करण्याचे प्रयत्नही झाले. पण, सदा सरवणकर ठाम राहिले.
अमित ठाकरे रिंगणात उतरल्यानं महायुतीमधील अनेक नेत्यांनी अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत भूमिका मांडली आहे. मात्र, सदा सरवणकर यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यास नकार दिला.
मुख्यमंत्र्यांनी अर्ज मागे घेण्यासाठी सरवणकरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. पण, कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यास सदा सरवणकरांनी स्पष्ट नकार दिला.
मी निवडणूक लढवणारच, असा निर्धार सदा सरवणकरांनी केला होता. अखेर आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यामुळे आता माहीममध्ये अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत अशी तिहेरी लढत होणार आहे.
त्यामुळे आता माहीममध्ये तिहेरी लढत होणार असून कोण बाजी मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.