Mahashivratri 2023: हर हर महादेव... मुंबईतील प्राचीन बाबुलनाथ मंदिराला आकर्षक सजावट, दर्शनासाठी भाविकांची रीघ
आज देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह पहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशभरात महाशिवरात्रीसाठी भाविक विविध तीर्थस्थळावर दर्शनासाठी गर्दी करत आहेत.
मुंबईच्या बाबुलनाथ मंदिराला देखील आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने मुंबईतील प्राचीन बाबुलनाथ शिवमंदिराला अतिशय सुंदर फुलांनी सजवण्यात आलं आहे.
पहाटे चार वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.
कोरोनानंतर यंदा बाबुलनाथला जलाभिषेक करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
दक्षिण मुंबईतील (South Mumbai) बाबुलनाथ मंदिरात जाण्यासाठी बेस्टकडून जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत.
बाबुलनाथ मंदिरात जाण्यासाठी सकाळी सात ते संध्याकाळी सात दरम्यान बससेवा चालवण्यात येणार आहेत.
संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह दिसून येत आहे.
प्राचीन आणि पौराणिक मान्यतेनुसार, महाशिवरात्री हा सण भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह उत्सव म्हणून साजरा केला जातो.