Maghi Ganesh Utsav : माघी गणेशोत्सवानिमित्त कांदिवलीतील सदगुरु मित्र मंडळाकडून भव्य मंदिराचा देखावा

मुंबई पश्चिम उपनगरातील सर्वात मोठा माघी गणेशोत्सव म्हणून ओळख असलेल्या सदगुरु मित्र मंडळाचा कांदिवलीचा इच्छापूर्ती गणेश ही यंदा दिमाखात विराजमान झाला आहे.

Kandivali Maghi Ganesh Utsav

1/10
मुंबईत आता फक्त गणेश चतुर्थीचा गणेशोत्सव नाही माघी गणेशोत्सवही मोठ्या जल्लोषात साजरे केला जात आहेत.
2/10
मुंबई पश्चिम उपनगरातील सर्वात मोठा माघी गणेशोत्सव म्हणून ओळख असलेल्या सदगुरु मित्र मंडळाचा कांदिवलीचा इच्छापूर्ती गणेश ही यंदा दिमाखात विराजमान झाला आहे.
3/10
कांदिवली इथल्या समतानगरमध्ये सद्गुरु मित्र मंडळातर्फे हा माघी गणेशोत्सव साजरा केला जातो.
4/10
प्रसिद्ध कला दिगदर्शक अमन विधाते हे या गणेशाची सजावट करतात.
5/10
यंदा मंडळाने भव्यदिव्य अनोखे मंदिर साकारले आहे.
6/10
या मंदिरात रंगसंगती दक्षिण भारत, नक्षीकाम राजस्थान, गुजरात तर खांब आणि कळस महाराष्ट्रासारख्या मंदिराचा बनवण्यात आला आहे.
7/10
तर संपूर्ण मंदिराला एलईडी लाईटस आणि विविध दिव्यांनी सजवले आहे. ही रोषणाई आणि रंगसंगती नेत्रदीपक दिसते आहे.
8/10
पुढील वर्षी राम मंदिराचे काम पूर्ण होऊन मंदिर भाविकांसाठी खुले होईल अशी शक्यता आहे. असेच मंदिर पुढील वर्षी या ठिकाणी साकारले जाणार आहे.
9/10
त्याबाबत जनजागृती ही यंदाच्या वर्षी देखाव्यातून सादर केली आहे.
10/10
भव्य देखावासह विविध सामाजिक उपक्रमही या माघी गणेशोत्सवानिम्मित या ठिकाणी राबवले जात आहेत.
Sponsored Links by Taboola