Lalbaugcha Raja Visarjan 2025: लालबागच्या राजा मंडळाला ती चूक भोवली; सुधीर साळवींनी सांगितलं कारण, नेमकं काय घडलं?
Lalbaugcha Raja Visarjan 2025: मुंबईच्या गणेशोत्सवाचं सर्वात भव्य आकर्षण असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत यंदा अभूतपूर्व खोळंबा पाहायला मिळाला.
Continues below advertisement
Lalbaugcha Raja Visarjan 2025
Continues below advertisement
1/12
Lalbaugcha Raja Visarjan 2025: मुंबईच्या गणेशोत्सवाचं सर्वात भव्य आकर्षण असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत यंदा अभूतपूर्व खोळंबा पाहायला मिळाला. 6 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता सुरू झालेली मिरवणूक तब्बल 33 तासांनंतर, 7 सप्टेंबरच्या रात्री उशिरा अखेर गिरीगाव चौपाटीवर विसर्जनानं संपन्न झाली.
2/12
यंदा लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी गुजरातमध्ये बनवण्यात आलेल्या मोटराइज्ड तराफ्याचा वापर करण्यात आला. मात्र, या तराफ्यावर मूर्ती विराजमान करण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट आणि वेळखाऊ ठरली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर मूर्ती तराफ्यावर स्थिर करण्यात यश आलं.
3/12
मूर्ती तराफ्यावर विराजमान झाल्यानंतरही, समुद्रात योग्य भरतीची प्रतीक्षा करावी लागली. भरतीची योग्य पातळी रात्री 9 वाजता प्राप्त झाल्यानंतरच विसर्जनाची प्रक्रिया सुरू झाली आणि लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडलं. 33 तासांच्या रखडलेल्या प्रक्रियेमुळे लाखो भाविकांना अपार संयम आणि श्रद्धेची कसोटी लागली होती.
4/12
लालबागचा राजाच्या विसर्जनाला उशीर का झाला?, नेमकी कारणं काय होती, लालबागचा राजा मंडळाला नेमकी कोणती चूक भोवली, याबाबत माहिती समोर आली आहे.
5/12
सगळ्यात पहिलं कारण म्हणजे लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीला गिरगाव चौपाटीवर येण्यास झालेला उशीर झाला. लालबाग राजा हा सकाळी साडेसात वाजता गिरगाव चौपाटी येथे आला. त्यावेळी ओहोटीची वेळ निघून गेली होती आणि उंच उंच लाटा उसळताना समुद्रात पाहायला मिळत होत्या. भरती ओहोटीची वेळ लालबाग राजा मंडळाकडून पाळण्यात आली नाही, तशा प्रकारचे नियोजन करण्यात आलं नाही.
Continues below advertisement
6/12
दुसरं कारण ज्यामुळे लालबाग राजाचं विसर्जन वेळेत होऊ शकलं नाही आणि विसर्जन रखडलं. सकाळी 05:16 वाजता कमी भरती म्हणजे ओहोटीची वेळ होती त्यामुळे सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान लालबाग राजाचे विसर्जन शक्य झालं असतंआणि सहज लालबागचा राजा हा ट्रॉलीतून नव्या तरफ्यात आणून पुढे त्याचं विसर्जन करता आलं असतं. मात्र या वेळेत लालबाग राजा हा गिरगाव चौपाटीवर पोहोचू न शकल्याने आणि साडेसात वाजता आल्याने खवळलेल्या समुद्रात आणि भरतीची वेळ जवळ आल्याने लालबाग राजाची गणेश मूर्ती ही ट्रॉलीमध्येच राहिली.
7/12
लालबाग राजाची मूर्ती ट्रॉलीतून तराफ्यावर आणता येत नव्हती कारण ज्या ठिकाणी लालबाग राजा गिरगाव चौपाटीवर आला त्या ठिकाणी उंच उंच समुद्राच्या लाटा उसळत होत्या आणि लालबाग राजाची गणेश मूर्ती अर्धी पाण्यात होती.
8/12
सकाळी 11: 44 वाजता 4.43 मिटर उंचीच्या समुद्राच्या लाटा उसळत होत्या कारण की भरतीची वेळ होती. त्यामुळे लालबाग राजा मंडळाला विसर्जनासाठी जोपर्यंत पाणी कमी होत नाही आणि खवळलेला समुद्र शांत होत नाही तोपर्यंत थांबावं लागणार होतं.
9/12
विसर्जनांसाठी आजूबाजूला असलेल्या बोटी सुद्धा भरतीची वेळ असताना पुन्हा एकदा किनाऱ्यावर लागल्या होत्या. त्यामुळे लाटा कमी होण्यासाठी भरतीची वेळ निघून कमी भरतीची म्हणजे ओहोटीची वेळेची सायंकाळी सहा वाजता वाट पहावी लागली.
10/12
साधारणपणे संध्याकाळी सात साडे सातच्या दरम्यान ट्रॉलीतून लालबाग राजाची मूर्ती तराफ्यात ठेवून आठ-साडेआठच्या दरम्यान तराफा हा समुद्राच्या आत मध्ये निघाला. अत्याधुनिक यंत्रणा असलेला हा नव्याने आणलेला ताराफ्यातून लालबाग राजाची मूर्ती समुद्रात नेण्यात आली आणि त्यानंतर तब्बल 33 तासानंतर लालबाग राजाचे विसर्जन झालं.
11/12
भरती ओहोटीची वेळ न पाळल्याने,योग्य नियोजन त्यानुसार न झाल्याने आणि लालबाग राजा हा गिरगाव चौपाटीवर उशिरा दाखल झाल्याने साधारणपणे 12 ते 14 तास उशिराने लालबाग राजाचे विसर्जन यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच झाले.
12/12
लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवी काय म्हणाले?- आमचा विसर्जन सोहळा हा पूर्णपणे भरती आणि ओहोटीवर अवलंबून असतो. लालबागचा राजा हे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे तराफ्यावर नेऊनच आम्ही विसर्जन करतो आणि आम्ही त्याच पद्धतीने विसर्जनाचा निर्णय घेतला. विसर्जनाला जो उशीर झाला त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो आणि मुंबई पोलिस आणि मुंबई महापालिका प्रशासनाचे मी आभार मानतो. भरती लवकर आली आणि आम्हाला 15 मिनिटे उशीर झाला त्यामुळे पुढील अडचणींचा सामना करावा लागला.
Published at : 08 Sep 2025 09:27 AM (IST)