In Pics : केडीएमसीचे कायापालट अभियान, विविध चित्रांनी उजळून निघाला बारावेचा रिंगरोड
कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून कल्याण डोंबिवलीमध्ये शहर सौंदर्यीकरणाचे विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशहरांच्या दृष्टीने महत्वाकांक्षी असणाऱ्या कायापालट अभियानाअंतर्गत कल्याण पश्चिमेच्या बारावे परिसरातील भिंतीही आता रंगी बिरंगी चित्रांनी उजळून निघाल्या आहेत.
अत्यंत देखण्या अशा या भित्तीचित्रांमुळे या भिंती उजळून निघाल्या आहेत
ठाकुर्ली येथील समांतर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या भिंतींवर देशातील दिग्गज व्यक्ती, शास्त्रज्ञ, कलाकार, खेळाडू आदींची चित्रं रेखाटली आहे
आता कल्याण पश्चिमेतील बारावे येथील रिंग रोड येथील भिंतीही आता रंगीबिरंगी चित्रांनी जिवंत झाल्या आहेत.
जे.जे स्कूल ऑफ आर्टच्या कृती पटेल, नेरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अक्षरशः जीव ओतून इथल्या भिंती जिवंत केल्या आहेत.
भिंतींवर प्राणी, पक्षांसह इतर अनेक उत्साह वाढवणारी बोलकी चित्रं इकडे साकारण्यात आल्याची माहिती प्रशांत भागवत यांनी दिली.
शहर सौंदर्याच्या दृष्टीकोनातून भित्तीचित्रांच्या पर्यायाला नागरिकांची मोठी पसंती मिळत आहे (सर्व फोटो - स्वप्नील शेजवळ )