Mumbai International Cruise Terminal: देशातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे आज मुंबईत उद्घाटन, समुद्राच्या लाटांसारखा छताची रचना; एकावेळी 5 क्रूझ पार्क होणार

Mumbai International Cruise Terminal: एमआयसीटी भारताच्या क्रूझ पर्यटन क्षेत्राला मोठी चालना देईल अशी अपेक्षा आहे. एकाच वेळी पाच क्रूझ जहाजे सामावून घेऊ शकते.

Mumbai International Cruise Terminal

1/9
मुंबईत देशातील सर्वात मोठ्या अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे उद्घाटन होणार आहे. पीएम मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होईल.
2/9
मुंबई बंदरातील इंदिरा डॉक, बॅलार्ड पियर येथे क्रूझ टर्मिनलची निर्मिती करण्यात आली आहे.
3/9
याला मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल (एमआयसीटी) असे नाव देण्यात आले आहे. खर्चाचा अंदाज ₹556 कोटी आहे.
4/9
याला भारतीय क्रूझ पर्यटनाचे प्रवेशद्वार म्हटलं जाईल. त्याचे छत समुद्राच्या लाटांसारखे दिसण्यासाठी डिझाइन केलं आहे.
5/9
सरकारने क्रूझ इंडिया मिशन अंतर्गत हे टर्मिनल जागतिक मानकांनुसार विकसित केले आहे.
6/9
415000 चौरस फूट क्षेत्रफळ असलेले, हे टर्मिनल दरवर्षी 10 लाख प्रवाशांना हाताळण्यास सक्षम आहे.
7/9
एकाच वेळी पाच क्रूझ जहाजे सामावून घेऊ शकते.
8/9
यात 72 चेक-इन आणि इमिग्रेशन काउंटर आहेत, ज्यामुळे प्रवाशांना जलद आणि अखंड अनुभव मिळतो.
9/9
या प्रकल्पांचे उद्दिष्ट सांस्कृतिक पर्यटनाला चालना देणे आणि प्रदेशात पर्यावरणीय शाश्वतता मजबूत करणे आहे. एमआयसीटी भारताच्या क्रूझ पर्यटन क्षेत्राला मोठी चालना देईल अशी अपेक्षा आहे.
Sponsored Links by Taboola