In Pics : चांदणं आणि आकाशाच्या सान्निध्यात 'स्काय डायनिंग'चा अनोखा अनुभव
बंगळूर, गोवा, पुण्यापाठोपाठ मुंबई-ठाणे परिसरात प्रथमच हवेत तरंगणारे रेस्टॉरंट सुरु करण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभिवंडी तालुक्यातील अंजुर इथल्या सया ग्रॅण्ड रिसॉर्टमध्ये हवेत तरंगणारे रेस्टॉरंट सुरु झालं आहे.
केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांच्या हस्ते स्काय डायनिंग रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यात आलं.
या रेस्टॉरंटमुळे एकाच वेळी 22 पर्यटकांना चांदणं आणि आकाशाच्या सान्निध्यात जेवण्याची, सेलिब्रेशन करण्याची संधी उपलब्ध होत आहे.
जमिनीपासून 120 फूट उंचीवर खवय्यांना जेवणाचा आनंद लुटता येणार आहे.
डायनिंग टेबलच्या सीट अशाप्रकारे डिझाईन केल्या आहे की तुम्हाला 360 अंशातून आजूबाजूचा परिसर पाहता येईल.
या स्काय डायनिंगच्या सीट पूर्णत: सुरक्षित आहेत.
जर तुम्हाला अॅडव्हेंचर आवडत असेल तर एकदा तरी स्काय डायनिंगचा अनुभव घ्या.
जर तुम्हाला अॅडव्हेंचर आवडत असेल तर एकदा तरी स्काय डायनिंगचा अनुभव घ्या.