Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरण; आयआयटी मुंबईसमोर विविध संघटनांचे आंदोलन, पोलिसांसोबत झटापट
काही दिवसांपूर्वी आयआयटी-मुंबईतील विद्यार्थी दर्शन सोलंकी याने आत्महत्या केली होती. आत्महत्या प्रकरणी दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आज आयआयटीच्या प्रवेशद्वाराजवळ विविध संघटनांनी आंदोलन केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया प्रकरणात अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती.
आयआयटीने स्वतंत्र चौकशी समिती नेमावी आणि कॅम्पस बाहेरील सामाजिक संघटनाच्या प्रतिनिधींचा सहभाग असावा. तसेच निःपक्षपातीपणे चौकशी करावी, आणि पिडीत दर्शन सोलंकी च्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी आदी मागण्या करण्यात आल्या
या आंदोलनात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, जाती अंत संघर्ष समिती, जनवादी महिला संघटना, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन आणि रोहिदास समाज संघटनाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला
पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. या झटापटीमुळे काही वेळेसाठी वातावरण तणावपूर्ण झाले होते.
जातीय भेदाभेद, जातीच्या आधारे उच्च जातीतील विद्यार्थी प्राध्यापक दलित आदिवसी मुलांचे शोषण करतात. यामुळे हे विद्यार्थी आत्महत्यांचे बळी ठरत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
आयआयआयटी व्यवस्थापन आणि पोलीस केवळ व्यक्तिगत तणावातून आत्महत्या असे भासवून वस्तुस्थिती दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप संघटनांनी केला.
दर्शन सोलंकीच्या आत्महत्येनंतर आयआयटी मुंबईतील दस्तक आणि इतर संघटनांनीदेखील जातीय भेदभावातून आत्महत्या झाली असल्याचा दावा केला होता.
आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमधील विद्यार्थ्यांनी या प्रकरणी आंदोलन केले होते.