Rain : मुंबईसह ठाणे पालघर परिसरात पावसाची जोरदार हजेरी

मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

rain news

1/9
सकाळपासूनच मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे.
2/9
ठाणे परिसरातही पावसाला सुरुवात झाली आहे.
3/9
पावसामुळं उष्णता कमी झाली आहे. हवेत गारवा निर्माण झाला आहे.
4/9
पालघर जिल्ह्यातही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
5/9
पावसामुळं पालघर जिल्ह्यातील शेतकरी बागायतदार यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
6/9
गेल्या पंधरा दिवस पाऊसच नसल्याने जिल्ह्यातील भात शेती संकटात सापडली होती
7/9
पावसामुळे मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मेंढवन खिंड येथील घाटात डोंगरावरून एक मोठा दगड अचानक महामार्गावर आल्याने या ठिकाणी वाहतुकीला अडथळा
8/9
सुदैवाने इतर कोणताही अपघात घडला नाही. यावेळी स्थानिक पोलीस दाखल होऊन त्यांनी वाहतूक सुरळीत केली .
9/9
आज सुरू झालेला पावसाने ह्या भात पिकाला जीवदान मिळणार आहे. त्यामुळं शेतकरी आनंदी आहेत.
Sponsored Links by Taboola