घाटकोपरमध्ये जलवाहिनी फुटल्याने ब्रिटीशकालीन 72 इंच पाईपलाईन रस्त्याला नदीचे स्वरुप, नागरिक झोपेत असताना घरात पाणी
घाटकोपरच्या (Ghatkopar) असल्फा विभागात 72 इंचाची जलवाहिनी फुटल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर 20 फुट खोल खड्डा झाला आहे.
ही जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा प्रचंड फवारा पाहायला मिळत आहे.
याचा प्रवाह इतका होता की, अनेक दुचाकी, आजूबाजूच्या घरांचे, दुकानांचे साहित्य वाहून गेले आहे.
घाटकोपर येथील असल्फा पाईपलाईन विभागात ब्रिटिशकालीन 72 इंचाची जलवाहिनी आहे.
ही जलवाहिनी अतिशय जीर्ण झालेली आहे, त्यामुळे ही जलवाहिनी वारंवार फुटल्याच्या घटना घडत आहे.
या आधी देखील ही जलवाहिनी फुटून अक्षरशः घरे कोसळली . तर आता देखील ही जलवाहिनी फुटल्याने मोठे नुकसान झाल्याचे समजते आहे.
मध्यरात्री 2 ते 2.30 पर्यंत पाण्याची पाईपलाईन फुटली असल्याची माहिती मुंबई महापालिकेला कळविण्यात आली, मात्र पालिकेचे अधिकारी गैरहजर असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
या जलवाहिनीतून पाणी इतक्या वेगाने बाहेर आले की अनेक घरे, परिसर आणि रस्ते पाण्याखाली गेले.