Mumbai Rains : मायानगरी मुंबई 'जलमय'
हवामान खात्यानं काही दिवसांपूर्वी दिलेल्या इशाऱ्याच्या धर्तीवर प्रशासनानं सर्वच यंत्रणांना येऊ घातलेल्या मान्सूनच्या दिवसांसाठी सतर्क राहण्याचा इशारा दिला. कुठे मान्सूनपूर्व कामांना वेग आला, तर कुठे शहरात सुरु असणाऱी रस्ते दुरुस्तीची कामं पूर्णत्वास नेण्याला गती मिळाली. (छाया सौजन्य- एएनआय)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण, मंगळवारपासून सुरु झालेल्या आणि बुधवारी जोर धरलेल्या या पावसानं पहिल्याच हजेरीत मुंबईकरांना हैराण केलं. (छाया सौजन्य- एएनआय)
वरुणराजा खऱ्या अर्थानं गरजत या शहरावर बरसला आणि काही तासांतच सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली. (छाया सौजन्य- एएनआय)
पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळं शहरात दृश्यमानता कमी दिसून आली. (छाया सौजन्य- एएनआय)
दादर, सायन, माटुंगा, मानखुर्द, चेंबूर या भागांमध्ये पाऊस अधिक जोरदार स्वरुपात बसरत असल्यामुळं सालाबादप्रमाणं इथल्या सखल भागांत लगेचच पाणी साचण्यास सुरुवात झाली. (छाया सौजन्य- एएनआय)
मुंबईच्या रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर याचे थेट परिणाम दिसून आले. सकाळच्या वेळी उपनगरांतून मुंबईत कामाच्या निमित्तानं येणाऱ्या वाहनांची गर्दी रस्त्यांवर पाहायला मिळाली. साचलेल्या पाण्यातून ही वाहनं वाट काढत मार्गस्थ होत होती. (छाया सौजन्य- एएनआय)
तिथे रेल्वे रुळांवरच पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतुकही ठप्प झाली. अनेक रेल्वे गाड्या दिरंगाईनं धावू लागल्या, तर काही रद्द करण्यात आल्या. (छाया सौजन्य- एएनआय)
थोडक्यात काय, तर पहिल्या पावसातच मायानगरी मुंबईची त्रेधातिरपीट उडाली. (छाया सौजन्य- एएनआय)