PHOTO : 'काळजी करु नका, शिवसेना आणि मी तुमच्यासोबत'; राऊतांच्या कुटुंबियांना उद्धव ठाकरेंकडून धीर
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या मातोश्री यांच्यामध्ये दहा मिनिटं भेट झाली. या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी आईंच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांच्या पत्नी तसेच मुली देखील यावेळी उपस्थित होत्या.
Uddhav Thackeray Meet Raut Family
1/6
खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली.
2/6
उद्धव ठाकरे आज दुपारी भांडुपमधील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आणि कुटुंबियांची भेट घेत त्यांना दिलासा दिला.
3/6
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या मातोश्री यांच्यामध्ये दहा मिनिटं भेट झाली.
4/6
या भेटीच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी आईंच्या तब्येतीची सखोल विचारपूस केली.
5/6
यावेळी संजय राऊत यांच्या पत्नी तसंच मुली देखील उपस्थित होत्या.
6/6
'काहीही काळजी करु नका, शिवसेना आणि मी स्वतः तुमच्यासोबत आहे,' असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी निघताना दिलं.
Published at : 01 Aug 2022 02:49 PM (IST)