Dasara Dadar Market : दसऱ्यामुळे मुंबईतील दादरचं मार्केट गजबजलं, झेंडूला मागणी
उद्याच्या दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर आज झेंडूची फुले आणि तोरण खरेदी करण्यासाठी दादरच्या फूल मार्केटमध्ये तुफान गर्दी झाली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदसऱ्यानिमित्त नागरिकांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे.
साडे तीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या या सणाला देशात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
विजयादशमीचा सण साजरा करण्यासाठी झेंडूची फुलं, शमीची आपट्याची पाने, तोरण खरेदी करण्यासाठी मुंबईकरांनी घराबाहेर पाऊल टाकलं आहे.
त्यामुळे दादरच्या फूल मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली.
दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांचा भाव वाढलेला पाहायला मिळत आहे. सध्या दादर मार्केटमध्ये झेंडू 100 रुपये प्रती किलोने विकला जात आहे
तर शेवंती 160 रुपये प्रति किलो, रजनीगंधा - ३०० रुपये प्रति किलो , लिली -400 रुपये प्रति किलोने विकला जात आहे
विजयादशमीचा सण झेंडूच्या फुलांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.
अवकाळी पावसामुळे झेंडूच्या फुलांचे नुकसान झाले. त्यामुळे झेंडूचा भाव हा वधारलेला दिसत आहे.
फूल आणि तोरणाच्या खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारात गर्दी केली आहे.