Mumbai Car Fire: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर 'बर्निंग कार'चा थरार; चालक थोडक्यात बचावला, PHOTO
Mumbai Car Fire: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारला भीषण आग लागल्याची घटना घडली.
Continues below advertisement
Mumbai Car Fire
Continues below advertisement
1/10
मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरीवलीतील देवीपाडा मेट्रो स्टेशनखाली एका धावत्या कारला मोठी आग लागली.
2/10
ही घटना आज (01 नोव्हेंबर) सकाळी अंदाजे सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
3/10
अंधेरीकडून दहिसरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर देवीपाडा मेट्रो स्टेशनखाली कारला अचानक आग लागली.
4/10
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
5/10
अग्निशमन दलाने सुमारे 15 ते 20 मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले.
Continues below advertisement
6/10
सुदैवाने कारचालकाने तत्परतेने वाहन थांबवून बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
7/10
मात्र, या घटनेत संपूर्ण कार जळून खाक झाली असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
8/10
आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
9/10
या घटनेचा अधिक तपास कस्तुरबा मार्ग पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी करत आहेत.
10/10
या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
Published at : 01 Nov 2025 09:55 AM (IST)