मंत्रालयाबाहेर नाशिकच्या आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पेट्रोलच्या बाटल्या घेऊन जोरदार घोषणाबाजी, पोलिसांची वेळीच कारवाई
Mumbai: अतिक्रमणाविरोधातील कारवाई थांबवावी आणि मागण्या मान्य कराव्यात, यासाठी आंदोलकांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता.
mumbai
1/9
नाशिकमधील अंबड येथील काही आंदोलकांनी मंत्रालयाबाहेर गेटजवळ आत्मदहनाचा प्रयत्न केला. या वेळी घोषणाबाजी करणाऱ्या काही महिलांसह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
2/9
आज भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन असतानाच, नाशिकमधील अंबड येथील काही आंदोलकांनी मंत्रालयाबाहेर गेटजवळ आत्मदहनाचा प्रयत्न करून खळबळ उडवून दिली.
3/9
लिसांनी तत्काळ कारवाई करत काही महिलांसह आंदोलकांना ताब्यात घेतले. घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांच्या हातातील पेट्रोलच्या बाटल्या आणि बॅनर्स पोलिसांनी जप्त केले.
4/9
आंदोलकांचा आरोप आहे की, नाशिक महानगरपालिकेच्या जागांवर अतिक्रमण झालेल्या तब्बल 130 कंपन्यांविरोधात गेल्या नऊ महिन्यांपासून आम्ही तक्रार करत आहोत, मात्र सरकार कारवाई करत नाही.
5/9
“नाशिकमध्ये उद्योग मंत्री फक्त खोके घेण्यासाठी येतात” असा थेट आरोपही आंदोलकांनी केला.
6/9
याशिवाय, महानगरपालिकेच्या जागेत जुगार अड्डा सुरु असल्याचे आणि महानगरपालिकेच्या पत्र्याबाबत वारंवार कळवूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे आंदोलकांनी सांगितले.
7/9
अतिक्रमणाविरोधातील कारवाई थांबवावी आणि मागण्या मान्य कराव्यात, यासाठी त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता.
8/9
आज मंत्रालयाबाहेर प्रत्यक्ष प्रयत्न करण्यात आला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून तो अयशस्वी ठरवला.
9/9
image 9
Published at : 15 Aug 2025 10:49 AM (IST)