PHOTO : बदलापुरात शतक महोत्सवी शिवजयंती निमित्त नितीन देसाई उभारणार भव्य सेट
Badlapur Shiv Jayanti Set
1/7
मुंबईजवळच्या बदलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची शतक महोत्सवी जयंती भव्य अशी होणार आहे.
2/7
विशेष म्हणजे या जयंती महोत्सवात सुप्रसिद्ध कलावंत दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा भव्य सेट बदलापूर गावात उभा राहत आहे.
3/7
खुद्द नितीन देसाई यांनी आज (25 एप्रिल) या सेटची पाहणी केली.
4/7
बदलापुरात 2 मे पासून 6 मे पर्यंत सलग पाच दिवस हा महोत्सव चालणार आहे.
5/7
या जयंती महोत्सवात विविध सांस्कृतिक, क्रीडा, आणि राजकीय कार्यक्रमांची मेजवानी चाखायला मिळणार आहे.
6/7
या महोत्सवात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थिती लावणार आहेत. शिवाय राज्यस्तरीय कुस्तीचे सामने, जाणता राजा महानाट्य, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर व्याख्यान, शाहीर नंदेश उमप याचे कार्यक्रम असणार आहे.
7/7
या कार्यक्रमाला राज्याच्या विविध भागातून लोक येणार असल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 3 मे 1927 रोजी बदलापुरात साजऱ्या झालेल्या शिवजयंतीचे अध्यक्षपद भूषवले होते, त्यासाठी आंबेडकर बदलापुरात आले होते.
Published at : 25 Apr 2022 01:43 PM (IST)