निर्बंध शिथिलतेनंतरची पहिली अंगारकी, सिद्धिविनायक मंदिरात भक्तांची गर्दी

@siddhivinayakganeshji

1/5
गणेश भक्तांसाठी महत्त्वाची असणारी अंगारकी चतुर्थी आज मंगळवारी आहे. अंगारकी चतुर्थी म्हटलं की गणेशभक्तांमध्ये विशेष उत्साह दिसतो.
2/5
अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते अशी भावना आहे.
3/5
त्यामुळे भाविकही अगदी भक्तीभावाने गणेशाची पूजा करून, त्याच्यासाठी उपवास धरून हे व्रत करतात. आज 23 नोव्हेंबर रोजी रात्री 08:27 वाजता चंद्रोदय होईल.
4/5
अंगारकीनिमित्त मुंबईतलं सिद्धिविनायक मंदिर रात्रभर खुलं होतं.
5/5
याशिवाय पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई मंदिरासह राज्यभरातील सर्व गणेश मंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे.
Sponsored Links by Taboola