In Pics : भिवंडीत पाणीपुरवठा चौकीत साडेपाच फुटी कोब्रा घुसल्याने कामगाराची पळापळ!
पावसाळ्यात सापांच्या बिळात पाणी शिरल्याने तसंच हवामानातील बदलामुळे भक्ष्य शोधण्यासाठी विषारी साप मानवीवस्तीत शिरल्याच्या घटना महिन्याभरापासून भिवंडीत घडत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यातच भलामोठा कोब्रा मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील पाईपलाईनची देखरेख करणाऱ्या चौकीत शिरल्याने कामगाराची पळापळ झाली.
या चौकीतून बीएमसीचे कामगार पाईपलाईनची देखभाल करतात. मात्र रविवारी दुपारच्या सुमारास अचानक चौकीतील कामगार फिटर गणेश चौधरी यांना लांबलचक कोब्रा घुसताना दिसला.
त्यांनी नागाला हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो चौकीच्या मागे असलेल्या एका पत्र्याखाली जाऊन दडून बसला. त्यांनतर त्यांनी चौकीत नाग शिरल्याची माहिती सर्पमित्र हितेश करंजावकर यांना दिली.
घटनास्थळी पोहोचून सर्पमित्र हितेश यांनी मोठ्या शिताफीने कोब्राला पकडून पिशवीत बंद केलं. यानंतर बीएमसीच्या कामगारांनी सुटकेचा निश्वास घेतला. साडेपाच फूट लांबीचा हा कोब्रा असून वन विभागाच्या अधिकाऱ्याच्या परवानगीनंतर जंगलात निर्सगाच्या सानिध्यात सोडल्याची माहिती सर्पमित्र हितेश यांनी दिली.
दुसरीकडे हवामानात बदल झाल्याने साप भक्ष्य आणि ऊब मिळावी म्हणून बिळातून बाहेर येऊन मानवीवस्तीत शिरत असल्याचं सर्पमित्रांचं म्हणणं आहे. कुठेही मानवीवस्तीत साप दिसल्यास सर्पमित्रांना याची तात्काळ माहिती देण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे.