PHOTO : भाईंदरमध्ये मच्छिमारांच्या जाळ्यात अडकलं 150 किलो वजनाचं कासव!
भाईंदरच्या भाटे बंदर इथल्या मच्छिमारांच्या जाळ्यात तब्बल 150 किलो वजनाचं दुर्मिळ कासव अडकलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाटे बंदर समुद्रकिनाऱ्यापासून 70 किमी आत 'याजक' ही बोट मासेमारी करत होती.
तेव्हा त्या बोटीतील मच्छिमारांच्या जाळ्यात हे भलंमोठं कासव अडकलं.
मात्र या बोटीचा नाकवा- अॅरल बुनकवली आणि तांडेल-रॉबिन बुनकवली यांनी कासवाला परत समुद्रात टाकण्याचा निर्णय घेतला.
या कासवाला बोटीतील मच्छिमारांनी सुखरुप परत पाण्यात टाकले.
कासवाचे वजन अंदाजे 150 किलो पेक्षा जास्त असल्याने बोटीवर असलेल्या मच्छिमारांची पुरती दमछाक झाली होती.
मात्र अखेर मोठ्या प्रयत्नानंतर कासवाला समुद्रात ढकलण्यात आलं.
वास्तविक समुद्री कासव पकडणे अवैध आहे.
याआधीही भाटे बंदर समुद्रकिनाऱ्यात एक व्हेल मासा अडकला होता. त्यालाही इथल्या मच्छिमारांनी परत समुद्रात सोडलं होतं.
त्यामुळे इथले मच्छिमार फक्त मासळी पकडणे हेच काम करत नसून, समुद्रातील दुर्मिल प्रजातीचं संरक्षण ही करत असल्याचं दिसून येत आहे.