Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खासदार नवनीत राणा बनावट जातप्रमाणपत्र प्रकरणात न्यायालयात हजर राहण्याची शक्यता
अपक्ष खासदार नवनीत राणा गुरूवारी बनावट जातप्रमाणपत्र प्रकरणात शिवडी दंडाधिकारी न्यायालयात हजर राहण्याची शक्यता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोर्टात हजेरी लावण्याच्या आदेशासह या प्रकरणातून दोषमुक्ततीसाठी त्यांनी दाखल केलेली याचिका मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळून लावली आहे.
त्यामुळे या प्रकरणी राणा आणि त्यांच्या वडीलांना कोर्टापुढे हजर राहणं अनिवार्य आहे.
नवनीत राणा अमरावतीतील ज्या लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यात. तो मतदारसंघ अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव होता. नवनीत राणा यांनी आपण अनुसूचित जातीतील असल्याचा दावा करून ती निवडणूक लढवली.
मात्र, त्यांनी दाखल केलेलं अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये (लिव्हींग सर्टिफिकेट) फेरफार करून मिळवल्याचे आढळून आलें.
त्यानंतर नवनीत राणा व त्यांचे वडिल हरभजन सिंह राम सिंह कुंडलेस यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांच्याविरोधात महिनाभरात दोनदा वॉरंट बजावले.
त्याविरोधात राणा यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेत, या प्रकरणातून दोषमुक्त करण्याची विनंती करणारी याचिकाही दाखल केली. या याचिकेवर विशेष सत्र न्यायाधीश राहूल रोकडे यांच्या समोर सुनावणी झाली.
दोन्ही बाजूंचा युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने राणांना या प्रकरणातून दोषमुक्त करण्यास नकार देताना याचिका फेटाळून लावली. त्यामुळे नवनीत राणा यांना आता पुढील सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर रहावे लागणार आहे.