राज्यातील आरोग्यसंस्थांचे ऑनलाईन मॉक ड्रील, पाहा फोटो
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. असून आज राज्याभरात आरोग्य शासकीय रुग्णालयातील सुविधांचा आढावा घेण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत सरकारच्या सूचनेनुसार, कोविडच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयीन पूर्वतयारीचा एक महत्वाचा भाग म्हणून आज राज्यातील द्वितीय आणि तृतीय स्तरावरील सर्व आरोग्य संस्थांचे ऑनलाईन मॉक ड्रील आज करण्यात आले.
हे मॉक ड्रील यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विभाग आणि जिल्हा स्तरावर नोडल अधिका-यांची नेमणूक करण्यात आली होती.
राज्यातील सर्व जिल्हे, महानगरपालिका आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी या महत्वपूर्ण मॉक ड्रील मध्ये सहभाग नोंदविला.
रुग्णालयातील उपलब्ध खाटा, आय सी यु सुविधा, यंत्रसामुग्री, ऑक्सिजन सुविधा, औषधसाठा, मनुष्यबळ, मनुष्यबळाचे प्रशिक्षण, टेलिमेडीसीनची सुविधा या सर्व बाबतीत राज्यातील रुग्णालयांचा आढावा आज घेण्यात आला.
आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत राज्यातील १३०८ संस्थांनी हे ऑनलाईन मॉक ड्रील पूर्ण केले आहे.
६१० शासकीय रुग्णालये, ६२८ खाजगी रुग्णालये, २८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि २७ खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी हे ऑनलाईन मॉक ड्रील आज पूर्ण केले आहे.
रुग्णालयात उपलब्ध मनुष्यबळ, सुविधांचा आढावा घेण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. असून आज राज्याभरात आरोग्य शासकीय रुग्णालयातील सुविधांचा आढावा घेण्यात आला.