Maratha Reservation: संभाजीराजेंनी उपोषण सोडलं...
उपोषण स्थळी एका लहान मुलाच्या हातून रस घेऊन खासदार संभाजीराजेंनी हे उपोषण सोडलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठा समाजाच्या मागण्यांसाठी गेली दोन दिवस सुरू असलेलं उपोषण हे खासदार संभाजीराजे छत्रपतींनी सोडलं आहे.
मराठा समाजाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याने हे उपोषण सोडत असल्याचं खासदार संभाजीराजेंनी सांगितलं.
खासदार संभाजीराजेंनी हे उपोषण मागे घ्यावं यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकारच्या वतीने त्यांची भेट घेतली.
त्यावेळी व्यासपीठावरच त्यांच्यामध्ये चर्चा झाली. लेखी आश्वासनाशिवाय हे उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका खासदार संभाजीराजे यांनी मांडली होती.
त्यानंतर मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य करत असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
त्यानंतर खासदार संभाजीराजेंनी आपले उपोषण मागे घेत असल्याचं सांगितलं.
त्यांनी पहिला व्यासपीठावर असलेल्या लहान मुलाच्या हातून रस घेत आंदोलन मागे घेतलं. त्यानंतर त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते रस घेतला. खासदार संभाजीराजेंसोबत त्यांच्या पत्नी संयोगिताराजे यांनीही आपलं उपोषण सोडलं.