Manoj Jarange Meet Santosh Deshmukh Family: मनोज जरांगे पाटलांना दारात पाहून धनंजय देशमुखांनी हंबरडा फोडला, गळ्यात पडून लहान लेकरसारखं रडले

Manoj Jarange Meet Santosh Deshmukh Family: मनोज जरांगे पाटील यांनी तातडीने आज सकाळीच मस्साजोग गाठत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांची भेट घेतली.

Manoj Jarange Meet Santosh Deshmukh Family

1/11
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या क्रौर्याची परिसीमा फोटोंद्वारे संपूर्ण राज्यासमोर आल्यावर संतापाची लाट उसळलीय.
2/11
मनोज जरांगे पाटील यांनी तातडीने आज सकाळीच मस्साजोग गाठत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांची भेट घेतली.
3/11
मनोज जरांगेंच्या भेटीवेळी धनंजय देशमुखांना अश्रू आवरले नाहीत.
4/11
मनोज जरांगे पाटलांना दारात पाहून धनंजय देशमुखांनी हंबरडा फोडला.
5/11
गळ्यात पडून लहान लेकरसारखं धनंजय देशमुख रडले.
6/11
मनोज जरांगेंनी धनंजय देशमुखांचं सांत्वन केलं.
7/11
धनंजय देशमुखांना पाहून मनोज जरांगेंना देखील अश्रू अनावर झाले.
8/11
धनंजय देशमुख आणि मनोज जरांगेंच्या भेटीदरम्यान मस्साजोग गावचे काही गावकरी देखील तेथे उपस्थित होते.
9/11
धनंजय देशमुखांना पाहून गावकरी देखील सुन्न झाल्याचं पाहायला मिळालं.
10/11
संतोष देशमुख हाता प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली. ऐरवी सकाळपासून आपली आस्थापने खुली करण्यासाठी व्यापाऱ्यांची लगबग पाहायला मिळते. मात्र या बंदच्या अनुषंगाने बाजारपेठा बंद ठेवल्या गेल्या आहेत.
11/11
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जावी. अशी मागणी यादरम्यान केली जातेय.
Sponsored Links by Taboola