Maratha Mumbai Morcha : आझाद मैदानात मनोज जरांगेंच्या उपोषणाला सुरुवात; स्टेजवर गणपतीची स्थापना
Manoj Jarange Patil: सरकारने मला गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही जेलमध्ये टाकले तरी जेलमध्ये सुद्धा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी हजारो मराठा आंदोलकांसमोर दिला.
Continues below advertisement
Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha
Continues below advertisement
1/6
Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आज (29 ऑगस्ट) आझाद मैदानामध्ये आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे. जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला प्रारंभ करताना सरकारला सुद्धा गर्भित इशारा दिला आहे.
2/6
मागण्यांची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मुंबई कदापि सोडणार नाही, सरकारने मला गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही. जेलमध्ये टाकले तरी जेलमध्ये सुद्धा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी हजारो मराठा आंदोलकांसमोर दिला.
3/6
दरम्यान, आज आझाद मैदानासह मुंबईत मराठयांचे भगवं वादळ धडकलं असून मराठा आंदोलकांची सर्वत्र मोठी गर्दी बघायला मिळत आहे.
4/6
दुसरीकडे मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात केली असून यावेळी स्टेजवर छत्रपती शिवरायांसह गणरायाचीही स्थापना करण्यात आली आहे.
5/6
यावेळी मनोज जरांगे यांच्या हस्ते गणरायाची पूजा आणि आरती करण्यात आली आहे.
Continues below advertisement
6/6
दरम्यान, आज संध्याकाळपर्यंत या उपोषणाला परवानगी देण्यात आली असून पुढे मनोज जरांगे काय निर्णय घेतात आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवता, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Published at : 29 Aug 2025 11:12 AM (IST)