Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा मेहुणा विलास खेडकरवर तडीपारीची कारवाई
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यावर देखील तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
Continues below advertisement
Vilas Khedkar
Continues below advertisement
1/6
मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यावर देखील तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
2/6
जालन्यात वाळू माफिया आणि गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे.
3/6
वाळू प्रकरणासह नऊ आरोपींना जालनासह, बीड, परभणी आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यावर देखील तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
4/6
यांच्यावर झालीय तडीपारीची कारवाई 1) विलास हरिभाऊ खेडकर, 2) केशव माधव वायभट, 3) संयोग मधुकर सोळुंके, 4) गजानन गणपत सोळुंके, 5) अमोल केशव पंडित, 6) गोरख बबनराव कुरणकर, 7) संदीप सुखदेव लोहकरे, 8) रामदास मसूरराव तौर 9) वामन मसुरराव तौर .
5/6
सदर आरोपींवर वाळू चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न, अंतरवाली सराटीच्या आंदोलनात केलेली जाळपोळ, सरकारी कामात अडथळा आणण्याचे जालना जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत.
Continues below advertisement
6/6
2019 पासून वेगवेगळ्या प्रकरणात हे गुन्हे दाखल आहेत. अंबड उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ही तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास खेडकरवर देखील तडीपारीची कारवाई त्याच्यावर पुढील गुन्हे दाखल आहेत- 1) 2021 मध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. 2) 2023 मध्ये जालन्यातील शहागड इथे बस जाळल्याप्रकरणी 307, 353 आणि 435 या कलमान्वये गुन्हा दाखल 3) 2023 मध्ये गोदावरी नदीतून 4 लाख 81 हजार रुपयांची 100 ब्रास वाळू चोरी प्रकरणी. 4) 2023 रोजी पाथरवाला बुद्रुक येथे गोदावरी मधून केणी च्या साह्याने 500 ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी गोंदी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल..यामुळे विलास खेडकर याला जालना , छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या तीन जिल्ह्यातून उपविभागीय न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
Published at : 10 Feb 2025 12:55 PM (IST)