Manikrao Kokate: अटक वॉरंटची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर शूट झालं, डॉक्टरांनी काय सांगितलं?

हृदयाशी संबंधित त्रासही जाणवत असल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने उपचार दिले आहेत.

Continues below advertisement

अटकेच्या भीतीने कोकाटेंचं ब्लड प्रेशर शूट; डॉक्टरांनी काय सांगितलं?

Continues below advertisement
1/10
शासकीय सदनिका घोटाळ्यात न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे माणिकराव कोकाटे यांची दोन्ही खाती काढून घेण्यात आली आहे.
2/10
उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोकाटे यांना सावरण्याच्या प्रयत्नात असले, तरी भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
3/10
माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी रात्री उशिरा आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे परंतु हा राजीनामा अजूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही.
4/10
मुख्यमंत्र्यांना हे पत्र प्राप्त झाल्यानंतर ते पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवले जाईल.
5/10
बुधवारी अटक वॉरंट जारी होण्याच्या हालचाली सुरू असतानाच माणिकराव कोकाटे रुग्णालयात दाखल झाले.
Continues below advertisement
6/10
त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.
7/10
उच्च रक्तदाब आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना काल दुपारी रुग्णालयात आणले गेले.
8/10
श्वास घेण्यास अडचण येत असल्याने त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याचे दिसून आले.
9/10
हृदयाशी संबंधित त्रासही जाणवत असल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने उपचार दिले आहेत.
10/10
सध्या डॉक्टरांनी त्यांना निरीक्षणाखाली अतिदक्षता विभागात (ICU) ठेवले आहे.
Sponsored Links by Taboola