In Pics : निसर्गाचा अनोखा नजारा, समुद्रातील लाटांमुळे मालवण रॉक गार्डन किनारपट्टीवर 'सफेद चादर'

Sindhudurg

1/5
राज्यात सक्रिय झालेल्या मान्सूनमुळे कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. समुद्र खवळून निघालाय जोरदार लाटा किनारपट्टीवर धडकत आहेत.
2/5
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण रॉक गार्डन येथील किनारपट्टी भागात पोलीस वसाहतीच्या मागे निसर्गाचा अनोखा नजरा दिसून येत आहे.
3/5
रॉक गार्डनच्या खडकात जोरदार लाटा धडकत असल्याने निर्माण झालेल्या फेसाळ पाण्याने जणू बर्फ पडावा अथवा कापूस पिंजावा अशी सफेद चादर किनाऱ्यावर पसरली आहे.
4/5
कोरोना काळ असल्याने निर्बंधांमुळे पर्यटक नाहीत. अन्यथा फेसाळ पाण्याचा अनोखा नजरा पाहण्यासाठी निश्चितच मोठी गर्दी उसळली असती.
5/5
मालवणात किनाऱ्यावर लाटांचा तयार होणारा फेस मुक्तपणे वाऱ्याने उडून आजूबाजूला पसरत असून हा नजरा अनेकांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. एकूणच बर्फाळ प्रदेशातील दृष्य मालवण किनारपट्टीवर दिसून येत आहे.
Sponsored Links by Taboola