कुटुंबापासून 11 वर्षे दूर, मोठ्या पगाराच्या नोकरीवर पाणी अन् सुरू केला दोन लाख किलोमीटरचा प्रवास; जाणून घ्या ध्येयवेड्या अवलीयाबद्दल
. प्रा. चेतन सिंह सोलंही यांना या दोन लाख किलोमीटरच्या प्रवासादरम्यान सलग अकरा वर्षे कुटुंबापासून लांब राहावे लागणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रा. सोलंकी हे सध्या एनर्जी स्वराज्य यात्रेवर आहेत. 2020 पासून सुरु झालेली त्यांची एनर्जी स्वराज्य यात्रा 2030 च्या अखेरपर्यंत म्हणजेच एकूण अकरा वर्ष चालणार आहे.
या कालावधीत ते भारतात दोन लाख किलोमीटरची यात्रा करून सुमारे शंभर कोटी लोकांना भेटून त्यांना ऊर्जेच्या बचतीसंदर्भात जागृत करणार आहेत.
प्रा. चेतन सिंह सोलंकी यांचं म्हणणं आहे की, सध्या आपण आपल्या गरजेपेक्षा खूप जास्त ऊर्जा वापरत असून त्याचे अत्यंत भीषण परिणाम पर्यावरणावर होत आहेत. आपल्याला भविष्यात अत्यंत भीषण नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यायचे नसेल आणि पर्यावरणाचे रक्षण करून आपली पृथ्वी येणाऱ्या पिढीसाठी किमान राहण्याजोगी ठेवायची असेल तर आजच आपल्याला आपला ऊर्जेचा वापर कमी करावा लागणार आहे.
प्रा. सोलंखी हे या प्रवासासाठी एका बसमधून निघाले आहेत. आता ही बसच त्यांचे घर आणि कार्यालय झाली आहे.
दिवसभर यात्रा करणे, ठिकठिकाणी थांबून लोकांना पेट्रोल, डिझेल, वीज आणि इतर कोणत्याही ऊर्जेच्या कमीत कमी वापराबद्दल जागृत करणे, कमीत कमी ऊर्जेचा वापर करून चांगलं आयुष्य कसं जगावं? याबद्दल लोकांना प्रशिक्षित करणे आणि रात्री त्याच बसमध्ये झोपणे असे त्यांचा दिनक्रम सुरू आहे.