PHOTO : धनंजय मुंडे जेव्हा वाढपी होतात...

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत परळीत निराधारांचा महामेळावा पार पडला. यावेळी या मेळाव्याला आलेल्या महिलांच्या पंगतीत स्वतः धनंजय मुंडे यांनी जेवायला वाढलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भोजनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर यावेळी मंडपातच निराधारांचा जनता दरबार झाल्याचे चित्र पाहायला मिळालं. धनंजय मुंडे यांनी स्वतः जमिनीवर बसून यांनी आनाथांचे प्रश्न ऐकून घेतले.

प्रथमच मोठ्या प्रमाणावर आयोजित या निराधार मेळाव्याला हजारो लाभार्थी आणि नागरिकांची उपस्थिती होती.
या महामेळाव्यात आलेल्या सगळ्यासाठी संयोजन समितीने भोजनाची सोय केली होती.
कार्यक्रम संपताच महिला मंडळाची पंगत जेवायला बसली, मोठी पंगत जेवायला बसल्याचे पाहून, वाढणात कमतरता होऊ नये म्हणून स्वतः धनंजय मुंडे जेवण वाढायला सरसावले.
महिलांच्या पंगतीत कुठे द्रोण, कुठे चपाती तर तिथे वरण वाढताना मंत्री महोदयांना पाहून सारेच जण कुतूहलाने पाहत होते.
परळीच्या मातीशी आणि इथल्या लोकांशी माझी नाळ जोडलेली आहे, असे मुंडे आपल्या भाषणात नेहमीच सांगत असतात.
जेवायला बसलेल्या लोकांची तारांबळ होऊ नये म्हणून मंत्री असून सुद्धा स्वतः जेवण वाढायला आलेल्या धनंजय मुंडेंना पाहून याची प्रचिती उपस्थितांना नक्कीच आली!