PHOTO : युक्रेनहून घरी परतलेल्या मुलाचे फटाके फोडून स्वागत
मेडिकलच्या शिक्षणासाठी युक्रेनला गेलेला बीडमधील माजलगांव येथील नौद अनिलकुमार हा विद्यार्थी काल आपल्य गावी परतला. नौद गावी परतल्यानंतर गावात फटाके फोडून त्याचे स्वागत करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीडमधील माजलगाव येथील तेजपाल चैधरी यांचा मुगला नौद हा पण काल सकाळी सुखरूप आपल्या घरी परतला.
नौद घरी परतल्यानंतर त्याला पाहताच कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. सुखरूप घरी परतणाऱ्या नौदचे कुटुंबीयांनी फटाके फोडून स्वागत केले.
माजलगांव येथील तेजपाल चैधरी हे व्यवसायाने व्यापारी आहेत. त्यांचा मुलगा नौद अनिलकुमार हा युक्रेन मधील विनित्सा शहरातील विनित्सा मेडिकल युनिवर्सिटीत एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेला होता.
नौदच्या वैद्यकिय शिक्षणाचे अजून एक वर्ष शिल्लक राहिले आहे. परंतु, रशिया अणि युक्रेनमधील युद्धामुळे त्याला भारतात परत यावे लागले आहे.
हंगेरीच्या सीमेवर आल्यानंतर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मोठ-मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे तब्बल 17 तासानंतर भारतीय दुतासाकडे नौद पोहोचला. परंतु, तेवढा वेळ तो उपाशी होता.
भारत सरकारकडून या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत जवळपास दोन हजार पेक्षा जास्त विद्यार्थी युक्रेनहून मायदेशी परतले आहेत.