Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात थंडी कायम, उत्तर भारतात कुठे पाऊस तर कुठे बर्फवृष्टी
उत्तर भारतातील (North India) अनेक भागात रात्री उशिरा जोरदार वाऱ्यासह हलक्या पावसानं (Rain) हजेरी लावली. वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळं हवामानात झपाट्यानं बदल होत आहे.
Maharashtra cold Weather
1/10
उत्तर भारतात पावसानं हजेरी लावली आहे. तर काही भागात बर्फवृष्टी झाली आहे. पावसानं हजेरी लावल्यामुळं थंडीचा जोर काहीसा कमी झाला आहे.
2/10
उत्तर भारतातील (North India) अनेक भागात रात्री उशिरा जोरदार वाऱ्यासह हलक्या पावसानं (Rain) हजेरी लावली. वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळं हवामानात झपाट्यानं बदल होत आहे.
3/10
राजधानी दिल्लीच्या (Delhi)नैऋत्य भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, आजही (25 जानेवारी) हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
4/10
दिल्लीतील सफदरजंगमध्ये जानेवारीमध्ये अत्यंत कमी पाऊस झाला आहे. मात्र, गतवर्षी जानेवारी महिन्यात 88.2 मिमी पाऊस पडला होता.
5/10
हवामान विभागानं उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पावासाचा इशारा दिला आहे.
6/10
महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम आहे. अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा 15 अंशाच्या खाली गेला आहे.
7/10
दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पावसाचा इशारा
8/10
राज्यात थंडीचा जोर (Cold Weather) कायम आहे. मात्र, काही भागात किंचित थंडी कमी झाली आहे. त्यामुळं काही भागात नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
9/10
राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर भारतात थंडी अद्यापही कायम आहे.
10/10
एकीकडे राज्यात तापमानात वाढ होत असताना नागरिकांना दिलासा मिळत आहे मात्र दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) अजूनही थंडीचा कडाका (Cold Wave) कायम आहे.
Published at : 25 Jan 2023 11:07 AM (IST)