Weather Update: आज संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; 'या' जिल्ह्यांत बरसणार कोसळधारा
पाऊस हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे. त्यामुळे आजपासून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागांमध्ये देखील पाऊस वाढणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज राज्यात मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे.
अनेक ठिकाणी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे.
पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांना आज अतिमुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिकसह ठाणे, पालघर, मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
विदर्भातील वाशिम आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
तर राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे, राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.
पुढील 3 ते 4 दिवसांत काही ठिकाणी तीव्र स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.