Weather : ऑक्टोबरमध्ये उन्हाचा चटका वाढणार
ऑक्टोबर (October) महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमाल तापमानात वाढ (temperature increase) होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया महिन्यात 'ऑक्टोबर हिट' चा अनुभव येणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे.
महाराष्ट्रात देखील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असून, ऑक्टोबर हिटचे चटके बसणार आहेत.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज आहे.
देशात जुलै आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाला आहे. देशात नैऋत्य मान्सूनमध्ये एकूण सरासरीच्या 94 टक्के पावसाची नोंद झाली आहे.
यंदाचा मान्सून सामान्य राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता.
तापमान वाढमार असल्यानं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी
महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे.
सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. पॉझिटिव्ह आयओडीमुळं सप्टेंबर महिन्यात देशभरात चांगला पाऊस झाला आहे