Photo: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद, 2 तारखेला लागणार निकाल
महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी (Graduate And Teacher Constituency Election) आज मतदान प्रक्रिया पार पडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामध्ये नाशिक, अमरावती या पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघातील पदवीधरांनी आणि शिक्षकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
आज सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया पार पडली आहे.
याचे निवडणुकीचे निकाल 2 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार असून या पाचही जागांची मुदत 7 फेब्रुवारी रोजी संपत आहे.
यातच कोणत्या विधान परिषदेच्या जागेसाठी आतापर्यंत किती टक्के मतदान झालं हे जाणून घेणार आहोत.
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीसाठी आज ठाणे जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. मतदानाची वेळ संपल्यानंतर दुपारी 4 वाजेपर्यंत जिल्ह्यात साधारणपणे 91.02 टक्के मतदान झाले.
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दुपारी चार वाजेपर्यंत 86 टक्के मतदान झालं आहे.
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत 49.67 टक्के मतदान झाले.
नाशिक पदवीधर मतदारसंघातील पाच जिल्ह्यात दुपारी 4 वाजेपर्यंत 49.28 टक्के मतदान झालं.
विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी विभागातील सहा जिल्ह्यात दुपारी चारपर्यंत 86.23 टक्के मतदान झाले आहे.