सोसाट्याचा वारा, तुफान पावसाची हजेरी, पिंपरी चिंचवडसह नांदेडला अवकाळी पावसाने झोडपले,Photos
राज्यात येत्या दोन दिवसांत ठिकठिकाणी अवकाळी पावसाचे इशारे देण्यात आले आहेत. दरम्यान, पिंपरी चिंचवडसह नांदेडमध्ये जोरदार सरींनी हजेरी लावली.
Unseasonal rain
1/7
पिंपरी चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अर्धा तास पावसाने चांगलंच झोडपून काढलं.
2/7
सकाळ पासून सूर्य अन ढगांचा लपंडाव सुरु होता. वातावरणात ही उकाडा निर्माण झाला होता.
3/7
मात्र दुपारी दीडच्या सुमारास अचानकपणे वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळं शहरवासीयांची चांगलीच तारांबळ उडाली.
4/7
वामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिला होता त्यानंतर आज सकाळ पासून नांदेड मध्ये ढगाळ वातावरण पहायला मिळाले.
5/7
दुपारी 2.30 वाजता पावसाचे आगमन झाले वाढत्या तापमानामुळे नांदेडकर चांगले सुखावले
6/7
मात्र या अवकाळी पावसाने शेतीला चांगला फटका बसला या पावसामुळे फळबागेचे नुकसान होईल अशी भीती व्यक्त केली जातेय.
7/7
राज्यात येत्या दोन दिवसांत विदर्भापासून कोल्हापूरपर्यंत आज 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय. सोसाट्याचा वारा आणि वादळी वारे येत्या चार दिवसांमध्ये दाखल होणार असल्याचं सांगण्यात आलंय.
Published at : 13 Apr 2025 03:32 PM (IST)