Rain : राज्यात आजपासून अवकाळी पावसाचा अंदाज
आजपासून राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) इशारा हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे.
unseasonal rain
1/10
राज्यातील तापमानात (Temperature) सातत्यानं चढ उतार होत आहे. आजपासून राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) इशारा हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे.
2/10
हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह पावसाची शक्यता आहे.
3/10
मध्य महाराष्ट्रात 15 आणि 16 मार्चला अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भात 16 आणि 17 मार्चला काही ठिकाणी गारपिटीसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहे.
4/10
गेल्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. अशातच आता पुन्हा हवामान विभागानं आजपासून पावसाचा अंदाज वर्तवल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
5/10
आज मराठवाड्यातही अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.
6/10
कोकणात देखील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
7/10
पालघर जिल्ह्यात पुढील दोन दिवस वादळी वारा, मेघ गर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
8/10
14 ते 16 मार्च, दरम्यान पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघ गर्जना व वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
9/10
15 मार्चला जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
10/10
16 मार्चला जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Published at : 14 Mar 2023 08:02 AM (IST)