मंदिरांची कुलपं उघडली; भाविकांची गर्दी लोटली, राज्यभरात नवरात्रोत्सवाची देवदर्शनानं सुरुवात
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर येथील रेणुका देवी मंदिर आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भक्तांसाठी खुलं करण्यात आले आहे.पहाटेपासूनच माहूर गडावर मोठ्या प्रमाणावर भक्तांनी गर्दी केलीय.मंदिर प्रशासनाकडून भक्तांना विना मास्क परवानगी दिली जात नसून कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. नवरात्री निमित्त मंदिर आणि परिसरात फुलांची सजावट करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज शारदीय नवरात्राला सुरुवात होत असताना गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेली राज्यातील मंदिरे खुली होत असून घटस्थापनेच्या या शुभमुहूर्तावर विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे . पुणे येथील विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांनी ही फुलांची सेवा दिली असून आजच्या सजावटीसाठी विविध प्रकारच्या जवळपास अडीच टन फुलांचा आणि तुळशीपत्राचा वापर केला आहे . यामध्ये लक्षावधी तुळशीच्या पानांसह झेंडू , गुलाब, अष्टर , शेवंती , जरबेरा , कागडा , कामिनी , ग्लॅडीओ या फुलांचा वापर करण्यात आला आहे . विठुरायाचा गाभारा त्याच्या लाडक्या तुळशीपत्राने भरून गेला असून रुक्मिणी मातेच्या मागे शेवंतीच्या फुलाचे पडदे करण्यात आले आहेत .
मुंबादेवी मंदिरात ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या भाविकांनाच प्रवेश असणार आहे.यासाठी मुंबादेवी मंदिराच्या वेबसाईट वर बुकिंग करता येईल.आजपासून नवरात्री उत्सव देखील सुरू होणार आहे.यामुळे या मंदिरात मोठ्या प्रमाणत गर्दी होण्याची शक्यता आहे.यासाठी इथे रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.पोलीस प्रशासन आणि मंदिर प्रशासन यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच बरोबर कोरोना नियमांचे पालन भाविकांकडून करून घेण्यास ही नियमावली करण्यात आली आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्र उत्सवात तुळजाभवानी देवीच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
देवीच्या महाद्वारावर ‘आई साहेब’ असे आकर्षक रोषणाईने लिहले आहे. तुळजाभवानी व तुळजापूर मंदीर हे रोषणाईने नटले असून ही आकर्षक रोषणाई कॅमेरात कैद करण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी होत आहे.
अखंड महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाचे श्रद्धास्थान असलेले पुण्यातील देहू आणि आळंदीची मंदिर आज पुन्हा खुली होतायेत. कोरोना नियमांना अधीन राहत, संत तुकोबारायांच्या आणि संत ज्ञानोबांच्या मंदिरात दर्शन बारी सुरू करण्यात आली. कोरोनाने शिरकाव केल्यापासून दोन्ही पालखे सोहळे, संजीवन समाधी सोहळे अन अनेक एकादशीवेळी वारकरी दर्शनाला मुखलाय. पण आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर सरकारने त्यांची ही प्रतीक्षा मिटवली आणि त्यांची त्यांच्या माऊलींशी भेट घडवून आणली. पण निर्बंधांचे पालन करूनच भाविक आणि वारकरी दर्शन घेतायेत. असं असलं तरी यातच समाधान मानून देवस्थान आणि भाविकांनी सरकारचे आभार मानलेत.
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पहाटे पाच वाजता भाविकांसाठी खुले करण्यात आले असून दर्शनासाठी गणेशभक्तांनी रांगा लावल्या आहेत.दगडूशेठ मंदिरावर फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे.श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.राज्य सरकारने अटी शर्ती देऊन मंदिर खुली करण्यास परवानगी दिली मात्र यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णत: फज्जा उडालेला पाहायला मिळाला.
अनेक दिवसापासून बंद असलेली मंदिरे उघडल्याने भाविकांनी दर्शनासाठी तुरळक प्रमाणात गर्दी केलीये आहे. जेजुरीचं खंडेरायाचं मंदिर सकाळी पूजा अर्चा झाल्यानंतर पहाटे 5 वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आलंय.. भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच गर्भवती महिला तसेच 10 वर्षातील मुले आणि 65 वर्षावरील वृद्धांना मंदिरात प्रवेश नसणार आहे.