In Pics : खूशखबर, मुंबई- पुणे दरम्यान धावणारी डेक्कन एक्सप्रेस 26 जूनपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत
कोरोनामुळे बंद असलेली मुंबई- पुणे डेक्कन एक्सप्रेस विशेष 26 जूनपासून सुरू होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे.
रेल्वेने मुंबई - पुणे विशेष डेक्कन एक्सप्रेस ट्रेनच्या सेवा व्हिस्टाडोम कोचसह 26 जूनपासून पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर प्रथमच ही ट्रेन व्हिस्टाडोम कोचसह चालणार आहे.
मुंबई- गोवा मार्गावरील प्रवाशांना उपलब्ध असलेले व्हिस्टाडोम कोचमधील प्रवास करतानाचे पश्चिम घाटाचे अनुभव आता मुंबई-पुणे मार्गावरही उपलब्ध होतील.
सध्या व्हिस्टाडोम कोच मुंबई -मडगाव जन शताब्दी विशेष ट्रेनमध्ये जोडलेला आहे.
विस्टाडोम कोचच्या मूलभूत विशेष वैशिष्ट्यांमध्ये वाइड विंडो पॅन आणि काचेचे छप्पर (टॉप), फिरण्यायोग्य खुर्ची आणि पुशबॅक खुर्च्या आदींचा समावेश आहे.
01007 विशेष डेक्कन एक्स्प्रेस 26 जून पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज सकाळी 7 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 11.05 वाजता पुण्याला पोहोचेल.
01008 डेक्कन एक्स्प्रेस विशेष 26 जून पासून दररोज दुपारी 3.15 वाजता पुण्याहून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी संध्याकाळी 7.05 वाजता पोहोचेल.
केवळ आरक्षण तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
सेवा पूर्ववत झाल्याने प्रवाशांची गैरसोय थांबणार असून दिलासा मिळणार आहे