Temperature Alert: नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?

महिन्याच्या सुरुवातीला मुंबई परिसरासह कोकण विभागात उष्णतेच्या लाटा निर्माण झाल्या असून साऱ्यांना चांगलाच घाम फोडलाय.

Temperature Today

1/8
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा भडका उडाला असल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होताना दिसतेय.
2/8
आज नंदूरबारमध्ये तापमानाचा पारा 40.8 अंशांवर जाऊन टेकलाय. नाशिकमध्ये वाढत्या तापमानझळांनी प्रशासन अलर्टमोडवर आलंय. नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये 10 बेडचे उष्माघात कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
3/8
आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी सिंधुदूर्गात उष्णतेची लाट नसली तरी उष्ण व दमट तापमानाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. राज्यात येत्या 4 दिवसांत तापमान चढेच राहणार असल्याचे पुणे हवामान शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी सांगितलंय.
4/8
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा भडका उडाला असल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होताना दिसतेय. येत्या 4 ते 5 दिवसात मुंबई, पुण्यासह विदर्भ आणि राज्यातील काही जिल्ह्यात उष्माघाताची लाट येण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
5/8
पूर्वेकडून वाहणारे उष्ण वारे सक्रिय असल्याने चढ्या तापमानाचा सामना चाकरमान्यांना करावा लागत आहे.
6/8
दरम्यान, दक्षिणेत पुढील २४ तासांत तामिळनाडूच्या अंतर्गत भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
7/8
राज्याच्या बहुतांश भागात तापमानाचा पारा चढाच असून या नकाशात नोंदवलेल्या तापमानानुसार, बहुतांश भागात 36 ते 40 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तुमच्या शहरात आज किती तापमान नोंदवले गेले हे या नकाशातून तपासता येईल.
8/8
उन्हाच्या कडाक्याने नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यारस्त्यावर सरबत, नारळ पाणी पिण्यासाठी थांबत काहीसा विसावा मिळवताना लाेक दिसतायत.
Sponsored Links by Taboola