Photo : विठुरायाला आजपासून उबदार पोशाख, काश्मिरी शाल आणि रेशमी मुंडासे!
सध्या राज्यभर अवकाळीमुळे थंडीचा कडाका अजून तरी जाणवत नसला तरी ऋतुमानानुसार विठुरायाला आजपासून उबदार पोशाख परिधान करण्यास सुरुवात झाली आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवास्तविक या काळात खरेतर राज्यभर कडाक्याच्या थंडीला सुरुवात होत असते
मात्र अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अजूनतरी म्हणावी अशी गुलाबी थंडीची चाहूल लागलेली नाही
कार्तिकी यात्रेच्या प्रक्षाळ पूजेनंतर दुसऱ्या दिवशी पासून दरवर्षी देवाला उबदार पोशाख परिधान करण्यास सुरुवात होते
यामध्ये उब देण्यासाठी देवाला मऊ काश्मिरी शाल आणि डोक्याला रेशमी मुंडासे बांधण्यास सुरुवात करण्यात आली आहे
रात्री शेजारातीनंतर विठुराया जेव्हा निद्रेसाठी जात असतो तेव्हा त्याच्या अंगावरील पोशाख काढण्यात येतो
देवाचे अंग पुसून घेतल्यावर देवाच्या डोक्यावरील मुकुट काढून तेथे 150 हात लांबीचे हे खास उबदार मुंडासे देवाच्या मस्तकावर वैशिष्ठ्यपूर्ण पद्धतीने बांधण्यात येते