ST Workers Strike : चक्क हेल्मेट घालून चालवली एसटी

st bus driver driving bus wearing helmet

1/9
राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी बस कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) सुरू आहे.
2/9
या संपामुळे गोरगरीबांची लालपरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बसची चाके जागेवरच थांबली.
3/9
विलीनीकरणाला पर्याय म्हणून राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना 41 टक्के पगारवाढ दिली. सरकारच्या या घोषणेनंतर काही कर्मचारी संघटना कामावर रूजू झाल्या.
4/9
परंतु, काही संघटना अजूनही संपावर ठाम आहेत. संपावर ठाम असलेल्या संघटना स्थानकाच बसची अडवणूक करत आहेत.
5/9
काही ठिकाणी बसवर दगडफेकीसारखेही प्रकार झाले. अशा प्रकारांपासून वाचण्यासाठी बस चालकाने चक्क हेल्मेट घालून बस चालवल्याचे पाहायला मिळाले.
6/9
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करणे शक्य नसल्याने त्याला पर्याय म्हणून सरकारने कर्मचाऱ्यांना 41 टक्के वेतनवाढीची घोषणा केली.
7/9
या घोषणेनंतर काही कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेत आपल्या सेवेला सुरूवात केली. परंतु, काही कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहेत.
8/9
अशा एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी संप मागे घेऊन कामावर परतण्याचे आवाहन केले आहे.
9/9
शिवाय वेतनवाढ दिल्यानंतरही संप सुरुच ठेवणार असाल तर दिलेली पगारवाढ रद्द करण्याचा इशाराही मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.
Sponsored Links by Taboola