PHOTO : शरद पवार यांच्या निवासस्थानात घुसून एसटी कर्मचाऱ्यांकडून चप्पल फेक, आंदोलक आक्रमक
ST Workers Protest
1/10
ST Workers Protest : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आहे.
2/10
एसटी कर्मचाऱ्यांनी यावेळी सिल्वर ओकच्या आवारात घुसखोरी करत आंदोलन केले.
3/10
आंदोलकांनी थेट शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पल फेक केली.
4/10
एसटी महामंडळाचे विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एक गट आज आक्रमक झाल्याचे दिसून आला.
5/10
पोलिसांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु, आंदोलकांनी सिल्वर ओकच्या परिसरात आंदोलन केले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सिल्वर ओक या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
6/10
दरम्यान, यावेळी या आंदोलनकर्त्यांची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. त्यांचं म्हणणं ऐकायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, आंदोलकांनी आपला आक्रमक पवित्रा काय ठेवला. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही.
7/10
बुधवारी हायकोर्टाने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर निकाल देताना सर्व कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रूजू होण्याचे आदेश दिले होते. तर, सरकारने कोणत्याही कर्मचाऱ्यांवर कारवाई न करण्याचे आदेश दिले.
8/10
एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी देखील आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली होती.
9/10
एसटी कर्मचारी पुन्हा कामावर परतील असे म्हटले जात असताना आज अचानकपणे एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या आवारात आक्रमक आंदोलन केले. यावेळी कर्मचारी निवासस्थान परिसरात घुसले.
10/10
शरद पवार यांच्या नावाने कर्मचाऱ्यांनी घोषणा दिल्या. पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला. परंतु, कर्मचारी सिल्वर ओक परिसर सोडायला तयार नव्हते.
Published at : 08 Apr 2022 04:01 PM (IST)